वाडी(अंबाझरी): वाडी जवळील ग्राम पंचायत लावा हद्दीतील सोनबा नगर येथे नुकतेच महिलाच्या व्यावसायिक प्रगती साठी एका व्यावसायिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.लावा येथील अशासकीय महिला बहुउद्देशीय संस्थेच्या पुढाकाराने आयोजित या महिला शिबारचे उदघाटन नागपूर पंचायत समिती चे उपसभापती सुजित नितनवरे यांचे हस्ते क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित अन्य अतिथी लावा ग्राम पंचायत सदस्य अनिल पाटील,सुलोचना डोंगरे याचे आयोजकांनी स्वागत केले.संस्थेच्या अध्यक्षा माधुरी हाडके यानी प्रस्तावनेतून व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम आयोजन चा उद्देश व महत्व समजावून दिले.या नंतर प्रमुख अतिथी सुजित नितनवरे यांनी उपस्थित महिलांना ग्रामीण क्षेत्रात यशस्वी होणारे लघु व्यवसाय,त्याची कार्यपद्धती,बचत गट,शासकीय लघु योजना इ ची माहिती देऊन,कुटुंबाच्या व स्व विकासाच्या प्रगतीसाठी व्यवसाय प्रारंभ करण्याचे फायदे पटवून दिले,तर ग्रा.प.सदस्य बँकेतून वितरित करण्यात येणारे मुद्रा कर्ज योजनेची माहिती उपस्थित महिलांना दिली.कार्यक्रमाचे आभार संस्थेच्या कोषाध्यक्ष योगिता बुरबुरे यांनी केले.सभेला परिसरातील महिला उपस्थित होत्या.