नागपुर – आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन सी आय टी यू च्या प्रतिनिधी मंडळ यांना सहा.अप्पर आयुक्त महानगरपालिका राम जोशी यांच्यातर्फे २ तारखेला १२ वाजता बोलावण्यात आले. किमान दीड तास चाललेल्या बैठकीत समाधान कारक चर्चा झाली.
(१) आशा वर्कर्स याना कोरीना सर्वेचे १००० रू. महिना मंजूर करून पत्र काढणार.त्यावर किमान २०० रू.रोज मिळावा याकरता युनियन तर्फे ताकीद दिल्यानंतर चर्चा करण्यासाठी काही मुदत मागितली.
(२) तक्रार निवारण समिती स्थापन करून युनियन चे किमान ५ आशा प्रतिनिधि व काही अधिकारी दर महिन्यात आढावा बैठक घेणार.
(३) आशा वर्कर्स ची प्रताडना थांबवण्यास आयुक्त स्वतः लक्ष देणार.
(४) पेट्रोल वर म न पा तर्फे १ रू. सेस आकारून आरोग्य सेवा बळकट करण्या करता आशा वर्कर ची मिळकत वाढवणार.
(५) आशा वर्कर्स यांना त्वरित सुरक्षा किट व साहित्य उपलब्ध करून देणार.
(६) जनतेच्या स्वास्थ्याची काळजी घेणाऱ्या आशा वर्कर्स यांचे स्वास्थ्याची काळजी करून कोरोना बाधीत आशा वर्कर्स याना राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था करून आशा चे कार्याबद्दल वर्तमान पत्रात बातम्या देणार. अश्या विविध विषयावर चर्चेतून शीक्का मोर्तब करण्यात आले. बैठकीत सहा.अप्पर आयुक्त राम जोशी,सहाय्यक आयुक्त निर्भय जैन, आरोग्य अधिकारी डॉ. चीमनकर साहेब, शहर समन्वयक रेखा निखाडे उपस्थित होते.
सी आय टी यू तर्फे युनियनचे अध्यक्ष राजेंद्र साठे कॉम.दिलीप देशपांडे महासचिव प्रीती मेश्राम सचिव रंजना पौनिकर कांचन बोरकर पिंकी सवाईथूल रुपलता बोंबले पौर्णिमा पाटील यांनी भाग घेतला. पाच तारखेपासून बेमुदत संप करणार आणि महानगरपालिका व बैठक न बोलावणाऱ्या व निर्णय न घेणाऱ्या जिल्हापरिषदे विरुद्ध संविधान चौकामध्ये 5 ऑक्टोंबर रोजी 11वाजता पासून आंदोलन करणार. जिल्हा परिषद विरुद्ध आमची भूमिका कायम राहणार असे युनियन चे अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले. ५ तारखेच्या आंदोलनात संगठना आपली भूमिका स्पष्ट करणार.
तसेच हातरस येथे दलीत मुलीवर झालेल्या बलात्कार घटनेचा निषेध सुद्धा सर्व महिला दर्शवणार.
(१) आशा वर्कर्स व गट प्रवर्तक यांना कोरोना कामाचे ३०० रू.रोज दया.
(२) कोरोना सर्वे करतांना मुबलक सुरक्षा साहित्य द्या.
(३) कोरोना बाधीत झालेल्या आशा किंवा गट प्रवर्तक यांची मानधन कपात थांबवा
(४) आशा व गटप्रवर्तक यांची प्रताडना थांबवा
(५) सर्वे करतांना आशा सोबत आरोग्य कर्मचारी तसेच स्वयंसेवक तसेच स्वयंसेविका देण्यात यावे. अध्यक्ष राजेंद्र साठे , महासचिव प्रीती मेश्राम आणि सचिव रंजना पवनीकर तसेच आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन, नागपूर.