– कामठी येथे आशा दिवस उत्साहात साजरा,आरोग्य विभागातर्फे आशा सेविकांचा सत्कार
कामठी :-शासनाच्या आरोग्यविषयक प्रत्येक योजनांची माहिती व लाभ आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचविणाऱ्या तसेच गरोदर मातेची वेळोवेळी आरोग्य तपासणी व नवजात शिशुचे संगोपन नियमित करण्याचे पुण्यकार्य आशा वर्कर वर्षाचे 365 ही दिवस अव्याहतपणे करीत असून अत्यंत कमी मोबदल्यावर काम करणाऱ्या या आशा सेविकांचे करावे तेवढे कौतुक कमी असून आशा वर्कर ने उत्तमरीत्या काम करून नवजात बालक व माता मृत्यूच्या दरामध्ये घट केला असल्याचे मौलिक प्रतिपादन जी प सदस्य प्रा अवंतीकाताई लेकुरवाडे यांनी कामठी पंचायत समिती सभागृहात आयोजित आशा दिवस कार्यक्रमात व्यक्त केले.
याप्रसंगी व्यासपीठावर पंचायत समिती उपसभापती आशिष मललेवार, पंचायत समिती सदस्य दिलीप वंजारी, रमेश लेकुरवाडे, प्रभारी गट विकास अधिकारी राठोडं, तालुका आरोग्य अधिकारि डॉ अश्विनी फुलकर, विस्तार अधिकारी गोपीचंद कातुरे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक रज्जू परिपगार आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात गावोगावातुन आलेल्या आशा सेविका ने हजेरी लावली होती.आशा सेविकांनी आरोग्य विषयक नृत्य,कविता,कथा,गीत इत्यादी च्या माध्यमातून आरोग्यबाबत महत्व पटवून दिलेत. यावेळी आशा वर्कर याना उत्कृष्ट बक्षिसे सुद्धा वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन आशा वर्कर चंदा माकडे यांनी केले.सदर कार्यक्रमात तालुक्यातील शेकडो आशा स्वयंसेविका ची उपस्थिती होती