नांदेड – देशाच्या सीमा रक्षणासाठी पठाणकोट येथे कर्तव्यावर असतांना नांदेड जिल्ह्यातील लोहगाव येथील वीर जवान विनोद वानोळे यांचे निधन झाले.
त्यांचा पार्थिव देह विमानाने नांदेड येथे आणण्यात आला. यावेळी विमानतळावर त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी आदरांजली वाहिली. खा.चव्हाण यांच्यानंतर आ.डी.पी.सावंत, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांनीही पार्थिवास पुष्पचक्र अर्पण केले.
यावेळी उपमहापौर विनय गिरडे, स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, माजी नगरसेवक किशोर भवरे, प्रवक्ते संतोष पांडागळे आदींची उपस्थिती होती.