Published On : Tue, Feb 13th, 2024
By Nagpur Today Nagpur News

अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हाती घेतले ‘कमळ’ !

Advertisement

मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत आज भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित चव्हाण यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.

देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांचे भाजपमध्ये स्वागत केले.आज आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे की महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ नेतृत्व आमच्याकडे आले आहे. देशाची लोकसभा आणि विधानसभा गेली अनेक वर्षे ज्यांनी गाजवली. विविध मंत्रिपदं ज्यांनी भुषवली आणि दोनवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकीर्द आपल्याला पाहायला मिळाली, असे फडणवीस म्हणाले.

Gold Rate
09 April 2025
Gold 24 KT 89,200/-
Gold 22 KT 83,000/-
Silver / Kg - 90,400/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश मुंबईतील भाजपच्या कार्यालयात झाला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन, हर्षवर्धन पाटील, भाजप नेते आशिष शेलार हे नेते उपस्थित होते.अशोक चव्हाण यांच्यासोबत नांदेड जिल्ह्यातील माजी आमदार अमर राजुरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

Advertisement
Advertisement