नागपूर :नागपूरमध्ये भ्रष्टाचारविरोधी कारवाई दरम्यान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मनोहर साखरेला ३० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
या प्रकरणात, एका ३१ वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली होती की साखरे यांनी त्यांच्याकडून लाच मागितली होती.
तक्रारदार याच्या विरुद्ध एम.आय.डी.सी.पोलिस स्टेशन अंतर्गत नागपूर शहर येथे फसवणूक केल्याबाबत तक्रार होती. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक साखरे करत होते.
सदर चौकशीमध्ये तक्रारदार विरुद्ध कोणतीही कायदेशीर कार्यवाही न करणे तसेच कोणताही फौजदारी गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात साखरे यांनी तक्रारदार यांना 30,000 रुपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडअंती 30,000 रुपये लाच स्वतः स्वीकारताना साखरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. तसेच त्यांना अटक करण्यात आली साखरे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूरमधील नागरिकांना आवाहन करण्यात येते की जर त्यांना कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने लाच मागितल्याचे आढळले तर त्यांनी ताबडतोब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.