नागपूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी ७ वाजतापासून सुरुवात झाली आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी सहा मतदारसंघ शहराच्या सीमेत आहेत तर सहा ग्रामीण भागात आहेत. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांत एकूण ४५ लाख २५ हजार ९९७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
महाराष्ट्रात ११ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी आली समोर सकाळी ११ वाजेपर्यंत महाराष्ट्रात १८.१४ टक्के मतदान झालं आहे. तर नागपुरात 11 वाजेपर्यंत 18.90 टक्के मतदान पार पडले. राज्यात सर्वाधिक 30 टक्के मतदान गडचिरोलीत झाले आहे.
नागपूर जिल्हा मतदान टक्केवारी (सकाळी 11 वाजेपर्यंत )-
हिंगणा १६.९२ %
कामठी १९.६२ %
काटोल १५.६९ %
नागपूर मध्य १५.४८ %
नागपूर पूर्व २०.५३ %
नागपूर उत्तर १६.३८%
नागपूर दक्षिण २०.२१ %
नागपुर दक्षिण पश्चिम १९.९१ %
नागपूर पश्चिम १८.३३ %
रामटेक २०.५२ %
सावनेर २०.२५%
उमरेड २३.४७ %