Published On : Thu, Jul 18th, 2024
By Nagpur Today Nagpur News

विधानसभा निवडणूक; अजित पवार गटाकडून विदर्भातून ‘इतक्या’ जागा लढविण्यात येणार,’या’ नेत्याचे विधान

Advertisement

नागपूर: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षाचे नेते कामाला लागले आहे. यात अजित पवार गटाकडून विदर्भातील जागांबाबत मोठे विधान करण्यात आल्याने राजकीय चर्चा रंगली आहे.

विधासभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाने २८८ जागांवर सर्व्हे सुरु केला आहे. राष्ट्रवादीसचे नेते धर्मराव अत्राम यांनी याबाबत माहिती दिली. आम्ही जागावाटपासंदर्भात पक्षांतर्गत बैठक घटली. त्यात आम्ही विदर्भातल्या ६० ते ६५ जागांपैकी १५ ते २० जागा लढवायला हव्यात, असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाल्याचे आत्राम यांनी सांगितले.

Today’s Rate
Thu17 Oct. 2024
Gold 24 KT 76,900 /-
Gold 22 KT 71,500 /-
Silver / Kg 91,700 /-
Platinum 44000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.

Advertisement

पटेल यांनी सांगितल्यानुसार आम्ही विदर्भातले असे १५ ते २० मतदारसंघ शोधत आहोत जिथे आम्हाला यश मिळेल,असे आत्राम म्हणाले.
नागपूरमध्ये काटोल मतदारसंघातून अनिल देशमुख प्रबळ उमेदवार मानले जातात. त्यांना आव्हान देण्याची आम्ही उमेदवार देणार आहोत. आमच्याकडे त्यांच्यापेक्षा मोठ्या ताकदीचा उमेदवार आहे, असेही आत्राम म्हणाले.