Published On : Thu, Aug 8th, 2024
By Nagpur Today Nagpur News

विधानसभा निवडणूक; नागपूर जिल्ह्यातील जागांसाठी मविआ-महायुतीमध्ये रस्सीखेच तर ‘या’ मतदारसंघासाठी काँग्रेसमध्ये मतभेद !

नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने उल्लेखनीय कामगिरी करत अनेक जागा जिंकल्या. तर भाजपप्रणित महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला. यातच आता विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने रणनीती आखण्यास सुरुवात केली.

नागपूरातील सहाही विधानसभेच्या जागेवर काँग्रेसचा दावा-
धानसभा निवडणुकीचे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसले तरी महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्यात जागावाटपावरून मतभेद सुरु असल्याचे बोलले जात आहे. नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मात्र गेल्या दोन टर्ममध्ये काँग्रेसला या ठिकाणी आपले वर्चस्व राखता आले नाही. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसने सर्व सहा जागा गमावल्या आणि 2019 मध्ये पश्चिम आणि उत्तर नागपूरच्या जागा भाजपकडून हिसकावून घेण्यात यश मिळवले. त्यामुळे काँग्रेसने यंदा नागपुरातील सहाही विधानसभा निवडणुकीच्या जागेवर दावा ठोकला आहे.

Gold Rate
Wednesday 05 Feb. 2025
Gold 24 KT 84,400 /-
Gold 22 KT 78,500 /-
Silver / Kg 96,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सर्व राजकीय पक्षांकडून नागपुरात उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात –
सर्व राजकीय पक्षांनी राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातही उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात झाली. दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. गिरीश पांडव, विशाल मुत्तेमवार यांच्यापाठोपाठ आता प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अतुल लोंढेही शर्यतीत सामील झाले आहे.

भाजपकडून दक्षिण नागपूरमधून सुधाकर कोहळे यांना उमेदवारीची शक्यता-
भाजपकडूनही दक्षिण नागपूर मतदारसंघात निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. या मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात मोहन मते यांची प्रकृती यावेळी कमकुवत असून दक्षिण नागपुरातून सुधाकर कोहळे हे प्रमुख दावेदार असू शकतात. याबाबतचा अंतिम निर्णय भाजप हायकमांडने घ्यायचा असला तरी यावेळी मोहन मते यांना भाजपचे तिकीट मिळाल्यास काँग्रेसचा उमेदवार सहज विजयी होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

नागपूर ग्रामीणमधील सहाही विधानसभेच्या जागांवर भाजपचे लक्ष –
नागपूर ग्रामीणमधील सहाही विधानसभेच्या जागा लढविण्याच्या भाजपच्या उत्सुक असल्याचे सांगण्यात येत आहे. या अनुषंगानंही शिवसेनेशी (शिंदे गट) आघाडी केलेले विदर्भातील दोन आमदार आशिष जैस्वाल आणि राजू पारवे यांच्या राजकीय भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय जैस्वाल हे रामटेकचे अपक्ष आमदार आहेत तर उमरेडचे आमदार पारवे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर रामटेक लोकसभा निवडणूक अयशस्वी लढण्यासाठी काँग्रेस आणि राज्य विधानसभेचा राजीनामा दिला. नागपूर ग्रामीणच्या सहाही मतदारसंघात भाजपला तिकीट मिळाल्यास दोघांचे काय होणार ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नागपूर जिल्ह्यातील मतदारसंघांचे चित्र पाहाता महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युला वादळी ठरेल,अशी चर्चा सुरु आहे.

Advertisement