मुंबई :केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचा दौरा केला. यानंतर निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी यावेळी विधानसभा निवडणुकी संदर्भात माहिती दिली.
महाराष्ट्र विधानसभेतएकूण 288 मतदारसंघ आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपते आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक त्याआधीच होईल.
महाराष्ट्रात 9.59 कोटी मतदार आहेत. त्यात पुरुष 4.59 कोटी मतदार आहेत. तर महिला 4.64 कोटी आहेत. आम्ही तृतीय पंथीय, वृद्ध मतदार, दिव्यांग यांची विशेष व्यवस्था करणार आहोत. वृद्ध मतदारांना मतदान करण्यासाठी आम्ही मत देण्याची विनंती करतो. त्यांना केंद्रात जाणं शक्य नसेल तर घरुन मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन दिली जाईल. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची संख्याही महाराष्ट्रात चांगली आहे. 19.48 लाख मतदार हे नवमतदार आहेत. हे तेच मतदार आहेत जे लोकशाहीला पुढे घेऊन जातील असंही राजीव कुमार म्हणाले.
दरम्यान राज्यात विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच पथक राज्यात दाखल झालेआहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वातील चौदा जणांचे पथक गुरुवारी रात्री मुंबईत दाखल झाले आहे. या पथकाने शुक्रवारी राज्यातील निवडणुकीसाठी तयारीचा आढावा घेतला