Published On : Mon, Nov 4th, 2024
By Nagpur Today Nagpur News

विधानसभा निवडणूक; नागपुरातून ‘या’ उमेदवारांनी अर्ज घेतले मागे

Advertisement

नागपूर: विधानसभा निवडणुकीचा शंखनाद झाला असून सर्व राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने आज दुपारी 3 वाजता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली. त्यामुळे आता कोणकोणामध्ये लढत होणार हे स्पष्ट झालं आहे. दोन आघाड्या आणि सहा पक्ष विधानसभा निवडणुकीत असल्याने बंडखोरी मोठ्या प्रमाणात होईल अशी शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार यंदा अनेक पक्षांमध्ये बंडखोरी झाली. कित्येकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून महाविकास आणि महायुतीकडून बंडोबांना शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.दरम्यान आज अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मात्र कित्येक बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला आहे.

उमरेड- रुपाली प्रमोद घरडे (अपक्ष), शशिकांत बारसु मेश्राम ( आझार समाज पार्टी), घनशाम सोमा राहाटे (अपक्ष), दर्शनी स्वानंद धवड ( अपक्ष), दिलीप सुखदेव बन्सोड ( अपक्ष), पद्माकर डोमाजी बावणे ( अपक्ष), प्रमोद रामचंद्र बावणगडे (अपक्ष), प्रशांत वासुदेवराव कांबळे ( अपक्ष), मिलिन्द इस्तारी सुटे (अपक्ष), राजू देवनाथ पारवे (अपक्ष), शशिकांत हिरामण मेश्राम (अपक्ष).

Today’s Rate
Thursday 21 Nov. 2024
Gold 24 KT 76,700 /-
Gold 22 KT 71,300 /-
Silver / Kg 91,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर उत्तर- महेंद्र तुळशीराम भांगे (अपक्ष), अनिल पांडुरंग वासनिक (अपक्ष), प्रविण पाटील (अपक्ष), रमेश श्यामरावजी वानखेडे (अपक्ष).

नागपूर पूर्व – कमलेश हरिचंद नागपाल (अपक्ष), तानाजी सुकलाजी वनवे (अपक्ष), सहदेव भिमराव गोसावी (अपक्ष), सागर दामोधर लोखंडे (अपक्ष), सुफियान खान (अपक्ष), संगीता महेश तलमले (अपक्ष).

कामठी – मनोज बाबुराव रंगारी, गणेश आनंद मुदलियार, गणेश बाबुराव पाटील, राजू रघुनाथ वैद्य, सचिन भानुदास पाटील, शौकत अली बागवान, राजेश बापुजी काकडे, दीपक सुधाकर मुळे, संविधान लोखंडे, किशोर मारोतरावर गेडाम.नागपूर दक्षिण – माधुरी मोहन मते (बळीराजा पार्टी), अरुण रामभाऊ गाडे ( अपक्ष).

नागपूर मध्य- अशोक आनंदराव धापोडकर, इरफान अहमद गुलामुस्सिबतैन, किशोर समुंद्रे, गंगाधर नागोराव पाठराबे, दीपक उमरेडकर, दीपक देवघरे, प्रफुल बोकडे, राजेश धकाते, विनायक माधवराव पराते (पट्टीवाले). शकील अहमद, संजय रामराव हेडाऊ, हरीशचंद्र वेळेकर.

काटोल- सुबोध बाबुराव मोहिते (अपक्ष), राजश्री श्रीकांत जिचकार (अपक्ष), नरेश जनकराव अरसडे (अपक्ष), वृषभ गजाननराव वानखेडे (अपक्ष), संदीप यशवंतराव सरोदे (अपक्ष)

नागपूर पश्चिम – नरेश वामनराव बरडे (अपक्ष), राजेश जानराव गोपाळे (अपक्ष), राजेंद्र बाबुलाल तिवारी (अपक्ष),

रामटेक- कारामोरे रमेश प्रभाकर, शांताराम विठोबाजी जळते, हरीषभाऊ गुलाब उइके, किशोर मनोहर बेलसरे, नरेश करन धोपटे, डॅा. राजू उर्फ राजेश ठाकरे, विक्की रतीराम जिभकाटे.

हिंगणा – कॅाम्रेड श्याम गुलाबराव काळे, दिनेश ताराचंद बन्सोड, शिवकुमार गोवर्धन मेश्राम, प्रजय दिनकर रामटेके, सौ उज्वला पुरुषोत्तम बोढारे, राहुल धनराज सोनटक्के, महेंद्र धनजीभाई मेश्राम, नागपुरे वृंदा प्रकाश.

नागपूर दक्षिण पश्चिम- मारोती सीताराम वानखेडे (बहुजन रिपब्लीकन सोशॅलीस्ट पार्टी).

सावनेर- मुकेश सुभाष मित्तल, मेहमुद युसूफ सिद्दीकी, राजू पुंजाराम कांबे. या सर्व उमेदवरांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

Advertisement