नागपूर: राष्ट्रीय पातळीवर नागपूर शहराला मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या लॉंग़ रन प्रकारातील धावपटू ज्योती चव्हाण व प्राची गोडबोले यांना असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉइज इंडियातर्फे (ए.पी.ई.आय.) प्रत्येकी 5,000 रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत दिल्ली हाफ मॕराथाॕन मध्ये २१ की.मी.शर्यतीमध्ये देशातून प्रथम व कु.प्राची गोडबोले हीने ४२ की.मी.मध्ये द्वीतिय क्रमांक पटकावला त्याबद्दल दोन्ही खेळाडूंना रेल्वे लोहमार्ग नागपूरचे पोलिस अधिक्षक राजकुमार, (भापोसे) , बहुजन सौरभ दैनिकाचे संपादक सिद्धार्थ कांबळे, यांचे हस्ते रोख मदत देवून सन्मानित करण्यात आल. सोबतच एपीईआयच्या वतीने त्यांना 1,000 रु. प्रती महीना शिष्यवृत्तीचा पहिला धनादेश देत दोन्ही धावपटूंच्या उत्तरोत्तरप्रगतीसाठी संघटना त्यांचे पाठीशी उभी राहील असे आश्वासन डॉ. किशोर मानकर (भावसे) यांनी दिले.
यावेळी राजकुमार यांनी दोघींना मुंबई येथे होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी शुभेच्छा देत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाव कामावल्यानंतर इतर तरुण खेळाडूंनाही सदर मुलींनी पी. गोपीचंद या सुप्रसिद्ध प्रशिक्षकासारखे घडवावे असे आवाहन केले. याप्रसंगी प्रशिक्षक रविन्द्र टोंग ह्याचा पुष्पगुच्छ देऊन डॉ. किशोर मानकर यांनी सत्कार केला.
प्रा.विलास तेलगोटे यांनी दोन्ही धावपटूंनी आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे समाजातील सुजाण नागरिकांनी मदतीचा हात देणे आवश्यक असल्याचे सांगितले.