Published On : Wed, Dec 4th, 2024
By Nagpur Today Nagpur News

आझाद मैदानावर उद्या फक्त मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांचाच होणार शपथविधी !

Advertisement

मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने दणदणीत विजय मिळविल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. यापार्श्वभूमीवर उद्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळला आझाद मैदानावर पार पडणार आहे.

यावेळी केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर आहेत.पंतप्रधान मोदी यांचा हा मुंबई दौरा कमी कालावधीचा आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून मिळाली. त्यामुळे केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे.

Today’s Rate
Wed 4 Dec. 2024
Gold 24 KT 76,700 /-
Gold 22 KT 71,300 /-
Silver / Kg 91,100/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आझाद मैदानावर या शपथविधीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन झालेले आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार- आझाद मैदानावर केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या वेळेमुळे इतर नेत्यांचा शपथविधी होणार नाही. परंतु इतर मंत्र्यांचा शपथविधीदेखील लवकरच पार पडणार आहे. मुंबईतील राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ स्थापित होणार आहे.

Advertisement