Advertisement
नागपूर : शहरातील हॉटेल द्वारकामाई येथे बॉम्ब ठेवल्याच्या माहिती मिळाल्याने खळबळ उडाली.हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्याने गणेशपेठ परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
आज सोमवारी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान माहिती मिळताच तातडीने कारवाई करत गणेशपेठ पोलीस आणि नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
अधिकाऱ्यांनी तत्काळ परिसराला वेढा घातला आणि तपास सुरू केला. बॉम्ब निकामी पथकांनी कसून शोध घेत असताना सार्वजनिक सुरक्षिततेच्या खातर
हॉटेलचा परिसर रिकामा करण्यात आला होता.
तपासणीनंतर नागपूर पोलिसांना हॉटेलच्या आवारात काही संदिग्ध वस्तू आढळून आल्याची माहिती आहे. मात्र ते बॉम्ब नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.