नागपूर,: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील (EWS) लोकांना स्वतःच्या हक्काची घरे मिळावी यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे तयार करण्यात आलेल्या घरकुलांचे ताबापत्र देण्यात येत आहे. मौजा तरोडी (खुर्द) ६३, सिम्बॉयसिस कॉलेज जवळ, नागपूर याठिकाणी आज शुक्रवार दिनांक, २६ फेब्रुवारी रोजी २८ लाभार्थ्यांना घरकुलांचे ताबापत्र देण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नामप्रविप्रा’ने तयार केलेल्या एकूण घरकुलांपैकी आतापर्यंत मौजा वाठोडा येथे १५१, मौजा वांजरी येथे भूखंड क्रमांक १ मध्ये ५ व भूखंड क्रमांक २ मध्ये २५ आणि आज तरोडी (खुर्द) ६३ मधील २८ घरकुलांचे असे एकूण २०९ लाभार्थ्यांना सदनिकांचे हस्तानंतरण करण्यात आले आहे.
मौजा तरोडी (खुर्द) येथे खसरा क्रमांक ६३ मध्ये तयार घरकुलांसाठी ५२५ लाभार्थ्यांपैकी १२० लाभार्थ्यांनी घरकुलांची संपूर्ण रक्कम जमा केलेली आहे. या १२० लाभार्थ्यांपैकी आजचे २८ लाभार्थी वगळता उर्वरित ९२ लाभार्थ्यांना येत्या १५ दिवसात मौजा तरोडी (खुर्द) ६३ येथे घरकुलांचे ताबापत्र देण्याचा नामप्रविप्रा’चा मानस आहे. तर मौजा तरोडी (खुर्द) मधील उर्वरित रक्कम जमा ने केलेल्या ४०५ लाभार्थ्यांनी व इतर ठिकाणी देखील घरकुलांची संपूर्ण रक्कम जमा न केलेल्या अश्या सर्व लाभार्थ्यांनी त्यांच्या घरकुलांची संपूर्ण रक्कम जमा करून घरकुलांचा ताबा घेऊन सदर घरकुलावर आपला नावाचा शिक्का मोर्तब करून घाव्ये, अशी विनंती नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणतर्फे करण्यात येत आहे.
उल्लेखनीय आहे कि, गुडीपाडवा सोडत २०२१ साठी उपलब्ध असलेल्या सदनिकांसाठी नव्याने आवेदन करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत लाभार्थ्यांना या घरकुलांसाठी आवेदन करता येणार आहे. घर हे प्रत्येक नागरिकाच स्वप्न असत, त्याला त्याच स्वतःच हक्काच घर मिळाव यासाठी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी यासाठी आवेदन करावे असे आवाहन आयक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तथा सभापती, नागपूर सुधार प्रन्यास श्री. मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी गरजू नागरिकांनी गोकुलपेठ येथील नागपूर सुधार प्रन्यासच्या प्रकल्प कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क करावा अथवा नामप्रविप्रा’च्या https://www.pmay.nitnagpur.org या संकेतस्थळ भेट द्यावे अथवा ०७१२-६७८३००० यावर दूरध्वनी ने संपर्क करावा.