नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तृतीय पंथींयाना सर्वच प्रवर्गात नोकरीसाठी 1 टक्का आरक्षण द्यावे, या मागणीसाठी नागपुरात विधानभवनाच्या एंट्री गेटवर तृतीयपंथींच्या प्रतिनिधींनी गोंधळ घातला. प्रसार माध्यमांशी संवाद साधण्यास नकार देण्यात आल्याने तृतीयपंथींनी याला विरोध केला.
विधानभवनात महाराष्ट्र सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना मागच्या गेटमधून बाहेर काढले, असा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्र सरकार त्यांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान सर्वच प्रवर्गात तृतीय पंथीय असतात. त्यामुळे सर्वच प्रवर्गात एक टक्का आरक्षण तृतीय पंथीयांना मिळावे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाबाबत आदेश दिले आहेत. आम्हांला स्वतंत्र आरक्षण नको. मात्र आहे, त्या सर्व संवर्गात एक टक्का आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी तृतीयपंथींनी केली आहे.