Advertisement
नागपूर: काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव आज विधीमंडळ काँग्रेस पक्षाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
विधानभवनातील विधीमंडळ काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात मंगळवारी सकाळी आमदारांची बैठक झाली. बैठकीच्या प्रारंभी महाराष्ट्र विधीमंडळ पक्षाचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खा. राहुल गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. या ठरावाला उपस्थित सर्व आमदारांनी पाठिंबा दिला आणि हा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.