कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा येथील महावीर नगर मधील एका कुलूपबंद घरातून लाखो रुपयांची घरफोडी झाल्याची घटना 12 मे ला घडली होती तसेच 2 जुलै ला सुद्धा त्याच परिसरातील एका कुलूपबंद घरातुन तबब्ल 3 लक्ष 17 हजाराची घरफोडी घडली असता यासंदर्भात फिर्यादी सागर राजू मदनकर यांनी स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंदवीत तपासाला गती दीली असता मिळालेल्या गुप्त माहिती च्या आधारे अट्टल चोरट्याचा शोध लावण्यात नवीन कामठी पोलिसांना यश प्राप्त झाले असून या चोरट्याकडून दोन घरफोडीतील चोरीस गेलेल्या मुदेमालापैकी 4 लक्ष 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .अटक आरोपीचे नाव सुरज सिद्धार्थ सोमकुवर वय 23 वर्षे रा लुंबिनी नगर कामठी असे आहे.
प्राप्त माहितीनुसार महावीर नगर रणाळा रहिवासी फिर्यादी सागर मदनकर यांची घरमंडळी 12 मे ला घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेरगावी गेले होते तसेच 2 जुलै ला प्रशांत टिकले यांच्या घरी सुद्धा लाखो रुपयाची घरफोडी झाली होती यातील अट्टल आरोपीला अटक करण्यात आले असून याकडून चोरीस गेलेला 4 लक्ष 25 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .
ही यशस्वी कारवाही डीसीपी हर्ष पोद्दार, एसीपी राजेश परदेसी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कांडेकर, डी बी स्कॉड चे पप्पू यादव, मंगेश लांजेवार, राजा टाकलीकर, सतीश ठाकूर यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.
संदीप कांबळे कामठी