नागपूर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मात्र आरक्षणार अद्यापही तोडगा निघालेला नाही. मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याजवळ ‘जवाब दो’ आंदोलन करण्याची तयारी केली होती. अनेक मराठी आंदोलक त्यासाठी मुंबईत जमले होते.
दरम्यान या मराठा आंदोलकांना गिरगाव चौपाटीजवळ थांबवण्यात आले आहे. तसेच रमेश केरे पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांची गाडी गिरगाव चौपाटीजवळ अडवण्यात आली.
रमेश केरे पाटील यांच्यासह सगळ्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
मराठा आंदोलकांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.सगळे राजकीय पक्ष फक्त मराठा समाजाला झुलवायचे काम करत आहेत, पण ठोस भूमिका कोणीही घेत नाही.त्यामुळे फडणवीस यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भाजपची भूमिका स्पष्ट करावी, असेही केरे म्हणाले.