नागपूर :राज्यात दिशा सालियान बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांनी उचलून धरला आहे. दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी आदित्य ठाकरे यांच्यासह अनेकांवर उच्च न्यायालयात याचिका करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून, विधानसभेतील घटनांचाही उल्लेख केला. त्यांनी सरकारवर विधानसभेच्या कार्यपद्धतीबाबत आरोप केले आणि सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
तुम्हीपण या गोष्टीच्या साक्षी आहात. गेल्या पाच वर्षापासून बदनामीचा प्रयत्न होत आहे. कोर्टात प्रकरण आहे. कोर्टात बोलू. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की, तुम्हाला वारंवार सांगितलं की, माझं ट्विट पाहिलं असेल. आम्ही या सरकारला या अधिवेशनात एक्सपोज केलं आहे.
आम्हीच नाही तर संघानेही एक्सपोज केलं आहे. काल तर संघाचे लोकही म्हणाले की औरंगजेब हा विषय चुकीचा आहे. मग भाजपचे मंत्री त्यावर कारवाई करणार का. आम्ही हाच प्रश्न विचारत आहे. महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.“आज महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या होत आहे. राज्याची स्थिती बिकट होत आहे. निवडणूक जिंकले हे आयोगामुळे. वोटर फ्रॉडमुळे.
त्यांनी १० मुद्द्यांपैकी एकही मुद्दा आणला नाही. एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. आज हाऊस माझ्यावरून बंद पाडत आहेत. पाडा. तुम्ही सत्ताधारी आहात. काम करायला निवडून दिले आहे. बोला ना महाराष्ट्राबद्दल. पाच वर्ष हे चालू आहे. कोर्टात जे होईल ते होईल. मी एकच सांगेल. पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न झाला आहे. आता कोर्टात बोलू, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.