Advertisement
नागपूर : भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय सहायक असल्याची खोटी माहिती देत मंत्रीपदाच्या बदल्यात भाजपा आमदारांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी गुजरातमधून अटक केली. नागपुरातील भाजपचे आमदार विकास कुंभारे यांनादेखील या भामट्याने फोन केला होता. हा भामटा कुंभारे यांच्याशी नेमकं काय बोलला. कधी-कधी त्याने फोन केले या संपूर्ण घटनाक्रमाची ऑडिओ व्हायरल क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.