नागपूर : महाराष्ट्रात औरंगजेबाचा कबर हटवण्याचा मुद्दा सातत्याने चिघळत चालला आहे. आज विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात निषेध केला. तसेच औरंगजेबाची कबर काढूनच राहणार असा निर्धारही केला आहे.
नागपुरातील महलस्थित शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी निदर्शने करण्यात आली. या निदर्शनादरम्यान अनेक विहिंप कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या विरोधात घोषणाबाजी केली. इतकेच नाही तर काही कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या पुतळ्यावर चप्पल फेकली, तर काहींनी त्याचा पुतळा जाळला.
दरम्यान, विश्व हिंदू परिषदेचे प्रादेशिक मंत्री गोविंद शेंडे म्हणाले की , विश्व हिंदू परिषद जे म्हणते ते करते. आम्ही म्हटले होते की मंदिर बांधले जाईल, म्हणून राम मंदिर बांधले गेले. आता, आम्ही म्हटले आहे की औरंगजेबाची कबर काढून टाकली जाईल. ती काढूनच टाकली जाईल. यासोबतच, महाराष्ट्र सरकारला औरंगजेबाची कबर काढून टाकण्यासाठीअल्टिमेटम देण्यात आला आहे.