Published On : Wed, Jan 3rd, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ऑटोचालकांनीही पुकारला बंद; ट्रकचालकांच्या ‘हिट अँड रन’ कायद्याविरोधी आंदोलनाला समर्थन

Advertisement

नागपूर : देशभरातील ट्रकचालकांनी हिट ॲन्ड रनच्या नवीन कायद्याच्या विरोधात संप पुकारला आहे. या संपाच्या तिसऱ्या दिवशी, बुधवारी नागपुरातील ऑटोचालकांनीही आंदोलनाला समर्थन देत बंद पुकारला आहे.

नागपूर जिल्हा ऑटोचालक-मालक महासंघाचे अध्यक्ष मोहनदास नायडू यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून ही माहिती दिली आहे. नागपूर जिल्ह्यातील विविध शहरातील शाळांमध्ये चालणाऱ्या महासंघाच्या ऑटोचालकांनी बुधवारी आपले ऑटो बंद ठेवून या आंदोलनाला समर्थन द्यावे, असे आवाहन नायडू यांनी समस्त ऑटोचालकाला केले आहे.

Advertisement
Wenesday Rate
Wednesday01 Jan. 2025
Gold 24 KT 76,900 /-
Gold 22 KT 71,500 /-
Silver / Kg 86,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नायडू यांच्यासह चरणदास वानखेडे, मोहन बावणे, कैलास श्रीपतवार, अरविंद पवार, देवेंद्र बेले, इसराइल खान, दासबोध आनंदम, अजय उके, देवेंद्र बागडे, अरविंद धवराल, किशोर माचेवार आणि विनोद कारेकर आदी सदस्य उपस्थित होते. महासंघाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना या संबंधाने निवेदनही दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, ऑटोचालकांच्या अनेक संघटना या आंदोलनात सहभागी आहेत.

Advertisement