संविधान चौकात धरणे आंदोलन
शाळकरी विद्यार्थ्यांना फटका
नागपूर: आॅटोरिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी शहरातील आॅटोरिक्षाचालकांनी संपाचे हत्यार उपसले आहे. मंगळवार ९ जुलैपासून आॅटोरिक्षा बेमुदत बंद राहतील. विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर यांच्या नेतृत्वातील बंद दरम्यान संविधान चौक येथे धरणे आंदोलन करण्यात येतील. या बंद मध्ये शहरातील विविध संघटनांचा सहभाग आहे. बंद दरम्यान शाळकरी विद्यार्थ्याच्या पालकांची चांगलीच तारांबळ उडणार आहे.
विम्याचे वाढीव दर कमी करण्यात यावे, खुले परमीट बंद करण्यात यावे, आॅटो चालक कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावनी करण्यात यावी, अवैध वाहतूक बंद करावी, जिल्हास्तरीय आरटीए कमिटीवर आॅटो चालकांचा एक प्रतिनिधी नियुक्त करण्यात यावा आदी मागण्यांसाठी ९ जुलै रोजी बंद पुकारण्यात आला आहे. अलिकडेच शाळा सुरू झाल्यात. बहुतेक विद्यार्थी आॅटोनेच शाळेत ये-जा करतात.
आता बेमुदत बंद पुकारण्यात आल्याने पालकांची चांगलीच धावपळ उडणार आहे. नेमही प्रमाणे आॅटोचालकांच्या प्रतिक्षेत असलेल्या पालकांना सकाळीच मुलांना शाळेत पोहोचविण्याची आणि परत आणन्यासाठी वेळ काढावा लागेल. या आंदोलना शहरातील आॅटोचालकांनी सहभागी व्हावे तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनी या आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहन भालेकर यांनी केले आहे. आॅटोचालक संघटनेचे पदाधिकारी राजू इंगळे, प्रिंस इंगोले, अल्ताफ अंसारी, अलिम, जावेद शेख, रवी सुखदेवे, किशोर इलमकर, आनंद मानकर, देवीदास महल्ले, आसिफ सत्तार, किशोर सोमंकुवर, सुधाकर चोरगुले, प्रकाश ठाकरे, आनंद चौरे, रवी तेलरांधे आदी पदाधिकारी सहकार्य करीत आहेत.
रेल्वे स्थानकावरही शुकशुकाट?
नागपूर रेल्वे स्थानकावरील प्रिपेड आॅटो सेवा संघटना ९ जुलैच्या बंद मध्ये सहभागी आहे, अशी माहिती लोकसेवा प्रिपेड आॅटो चालक मालक संघटनेचे अध्यक्ष अल्ताफ अंसारी यांनी दिली. बंद मुळे रेल्वे स्थानकावरून शहरात नियोजित स्थळी जाणाºया प्रवाशांची चांगलीच गैरसोय होईल. अलिकडेच रेल्वे स्थानकावर आॅटो व्यतिरीक्त खासगी वाहनाची (कार) सोय उपलब्ध आहे. त्यामुळे या बंदचा प्रवाशांना फारसा फटका जाणवनार नाही, असे बोलले जात आहे.