मनपा-ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचा उपक्रम
नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्यावतीने मंगळवारी (ता. १४) हनुमान नगर झोन अंतर्गत सिद्धेश्वर सभागृह चौक मानेवाडा रोड परिसरात पौर्णिमा दिवसा निमित्त जनजागृती करण्यात आली.
जनजागृती उपक्रमादरम्यान ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी परिसरातील दुकाने, आस्थापनांना भेट देउन तिथे वीज बचतीचे महत्व सांगितले व नागरिकांना किमान एक तास अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले. परिसरातील व्यापारी बांधवांनीही मनपा व ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्युत दिवे बंद करून उपक्रमात आपले योगदान दर्शविले.
ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात टीम लीडर सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, सुजय कालबांडे, पारस जांगडे, साक्षी मुळेकर, तुषार देशमुख, शुभम येरखेडे, प्रणाली सुर्यवंशी आदींनी परिसरात जनजागृती करीत व्यापारी व नागरिकांना त्यांच्या प्रतिष्ठान व घरातील वीज दिवे एक तासांकरिता बंद करण्याची विनंती केली.
या मोहिमेत भोलानाथ सहारे, किशोर बागडे, माजी नगरसेवक अभय गोटेकर, विजय फडणवीस, विश्वनाथ कुंभलकर, माजी नगरसेविका भारती बुंडे, मधुकर पाठक, हरीओम भद्रे, प्रणिता लोखंडे, भाग्यलता ताजखंडे, ममता डांगे, रेखा जोगदंड, शामसुंदर ढगे, दिलीप वंजारी, शेखर पवार, रमेश शेंडे, संजय तितरमारे आदींनी सहभाग नोंदविला.