नागपूर महानगरपालिकेद्वारे आयोजित व्हॉईस ऑफ विदर्भची अंतिम फेरीत कलावंतांनी रिझविले
नागपूर: आयुष मानकर हा मुलांच्या गटातून, धनश्री वाटकर हे युवा गटातून तर प्रसन्ना नायक हे प्रौढ गटातून व्हाईस ऑफ विदर्भ पर्व २ चे विजेते ठरले.
नागपूर महानगरपालिका, आई फाऊंडेशन आणि लकी इंटरटेंटमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने व्हॉईस ऑफ विदर्भ पर्व २ च्या अंतिम फेरीचे आयोजन रविवारी (ता.१) कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले.
यावेळी महापौर नंदा जिचकार, क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, शिक्षण समिती उपसभापती प्रमोद तभाने, समाजसेविका रिचा जैन, प्रिती दास, संयोजक लकी खान प्रामुख्याने उपस्थित होते. तिन्ही गटातील प्रथम तीन विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
वयोगट ३ ते १५ या किशोरवयीन गटातून प्रथम क्रमांक आयुष मानकर, द्वितीय क्रमांक सारिका बोभाटे, तृतीय क्रमांक पूर्वा सहारे यांनी पटकाविला. वयोगट १६ ते ४० युवा गटातून प्रथम क्रमांक धनश्री वाटकर, द्वितीय क्रमांक गौरव सहारे, तृतीय क्रमांक रिदा शेख, वयोगट ४१ च्या वरील गटातून प्रथम क्रमांक प्रसन्ना नायक, द्वितीय गटात अरूण नलगे, तृतीय क्रमांक विजय ढवळे विजयी झाले. किशोरवयीन गटातून अनुश्री केळकर, हर्षद चवरे, श्रावणी खंडारे तर युवा गटातून चेतन आमटे, भाग्यश्री वाटकर आणि प्रौढ गटातून श्याम बापटे, नित्यानंद रेड्डी यांना उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात आली.
अंतिम फेरीमध्ये अनिलकुमार खोब्रागडे, यशश्री भावे पाठक, पंकज सिंग, सुनील गजभिये, अंकिता टकले, स्वस्तिका ठाकूर यांनी परीक्षक म्हणून कार्य केले. प्रथम विजेत्या स्पर्धकाला २१ हजार रूपयांचा धनादेश आणि ट्रॉफी, द्वितीय विजेत्या स्पर्धकाला ११ हजार रूपयांचा धनादेश आणि ट्रॉफी, तृतीय विजेत्यांना पाच हजार रूपयांचा धनादेश आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, नागपूर महानगरपालिका प्रत्येक क्षेत्रातील कलाकारांना व्यासपीठ निर्माण करून देणारी पहिली महानगरपालिका असल्याचे सांगितले. यावेळी रिचा जैन यांनीही मनोगत व्यक्त केले.
अंतिम फेरीतील स्पर्धकांची गाणी संपल्यानंतर यशश्री भावे पाठक, पंकज सिंग, सुनील गजभिये, अंकिता टिकले, स्वस्तिका टिकले यांनी गाणं सादर केले. अंतिम फेरीसाठी संपूर्ण विदर्भातून २७ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. व्हॉईस ऑफ विदर्भच्या पर्व २ मध्ये संपूर्ण विदर्भातून ३५०० स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचे संयोजक लकी खान यांचा महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.