Published On : Tue, May 22nd, 2018

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक: आझाद शेतकरी संघटनेचे भाजपाचे हेमंत पटले यांना जाहीर समर्थन


नागपूर: भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार हेमंत ऊर्फ तानूभाऊ पटले यांना आझाद शेतकरी संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष किशोर पंचभाई यांनी एका पत्रपरिषदेत नागपुरात जाहीर समर्थन घोषित केले असून ही माहिती आझाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई यांनी दिली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भंडाराचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विकास कामांमुळे प्रभावित होऊन आपण भाजपा उमेदवाराला समर्थन घोषित केले आहे. अपक्ष उमेदवार म्हणून या निवडणुकीत मी उमेदवारी अर्ज सादर केला असून ट्रॅक्टर हे चिन्ह मला मिळाले आहे. आता भाजपा उमेदवार हेमंत पटले यांचा प्रचार मी सक्रियपणे करणार आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील मतदारांनी व समाजबांधवांनी येत्या 28 मे रोजी होणार्‍या निवडणुकीत हेमंत पटले यांनाच मतदान करावे अशी विनंतीही पंचभाई यांनी यावेळी केली आहे.

यापूर्वी आझाद शेतकरी संघटनेला शिवसेनेने पाठिंबा दिला होता. आझाद शेतकरी संघटनेने भाजपा उमेदवार हेमंत पटले यांना समर्थन जाहीर केल्यामुळे आता पवनी तालुक्यात भाजपा उमेदवाराचे प्राबल्य वाढले आहे. पटले यांच्या निवडणूक प्रचारात आपण सक्रिय सहभागी होणार असून त्यांना विजयी करण्याचा निश्चय आपण केला आहे. हे समर्थन आपण पूर्ण विचाराअंती जाहीर केले असून कोणाचाही माझ्यावर दबाव नसल्याचेही किशोर पंचभाई यांनी म्हटले आहे.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement