Published On : Fri, Aug 25th, 2023

नागपूर गुन्हे शाखेकडून फरार आरोपी बाबा टायगरला अटक

Advertisement

नागपूर : नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने गुरुवारी रात्री उशिरा कुख्यात आरोपी बाबा टायगरला बेड्या ठोकल्या आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आरोपी टायगर हा फरार होता. नागपुरात त्याच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.

गुन्हे शाखा युनिट 2 चे अधिकारी बाबा टायगर च्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून होते. अखेर गुरुवारी त्याला पकडण्यात यश आले.

Advertisement

पोलिस आयुक्त, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) आणि पोलिस उपायुक्त (डीसीपी) डिटेक्शन यांच्या देखरेखीखाली गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने ही कारवाई केली आहे.