पांढरकवडा : वनसंपदेने नटलेल्या पांढरकवडा तालुक्यातील वाघांचे अस्तित्व सिद्ध झाल्यानंतर आता त्यांची संख्याही वाढू लागली आहे. टिपेश्वर अभयारण्यात गुरुवार ला दोन वाघिणीसह सात बछड्यांचे दर्शन झाले. वाघांची ही वाढती संख्या भविष्यात मानव आणि वन्यजीव यांच्या संघर्षाची नांदी ठरू शकते.
त्यासाठी आत्तापासूनच उपाययोजनांची गरज असून सोलर फेनसिंग हा त्यावरील प्रभावी उपाय ठरण्याची शक्यता आहे. जंगलात आढळणारा पट्टेदार वाघ, हा तेथील वनसंपदा परिपूर्ण असल्याचे द्योतक मानले जाते. सुदैवाने संपूर्ण जग वाघाच्या प्रजातीला वाचविण्यासाठी धडपडत असताना पांढरकवडा वनविभागात २२ पट्टेदार वाघ आहेत.
तसेच सात नवीन पिलसुद्धा जन्माला आली आहे. वाघाला अनुकूल असे वातावरण आहे. यातूनच वाघांची संख्या वाढत असल्याचे मागील काही वर्षात दिसून येत आहे. सोलर कंपाऊंडचा प्रस्तावएकीकडे ‘इकोटुरिझम’चा ओढा वाढत असून कॅमेऱ्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर वाघ असल्याचा बातम्यांचा प्रसार व प्रचार होत आहे.
यातून वाघांच्या संरक्षणाचा प्रश्न उद्भवला आहे. अन्न साखळीत शेवटच्या टोकावर असलेला वाघ आणि तृणभक्षक डुकर, रोही, हरीण यांचीही संख्या वाढत असल्याने जंगल भागात शेती करणे कठीण झाले आहे. निसर्गाशी पूरक असलेले वन्यजीव व शेतकरी या दोघांच्याही संघर्षाला टाळण्यासाठी उपाययोजनेची खरी गरज निर्माण झाली आहे.
टिपेश्वर अभयारण्यातील ३ मिहिण्याआधी २ वाघिणी बछड्यांना जन्म दिला असून एका वघिनिनी ३ तर दुसऱ्या वघिनिने ४ बछड्यांना जन्म दिला असून गुरुवारी ७ बछड्यांचेदर्शन; एकाच वेळी एवढे वाघ आणि बछडे दिसल्याची ही पहिलीच घटना. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात गुरुवारच्या सफारीमध्ये सकाळी एकाच वेळी तीन वाघिणी आणि बछडे पर्यटकांना न्याहाळता आले.
आर्ची वाघिणीसोबत ३ बछडे, तलाव वाली वाघीण अन् तिचे ४ बछड्यांचे दर्शन झाल्याने पर्यटक हुरळून गेले. २०१८ मध्ये २२ वाघ अभयारण्यात असल्याची माहिती होती. तेव्हापासून एकाच वेळी एवढे वाघ आणि बछडे दिसल्याची ही पहिली घटना असल्याचे पारवा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक येवतकर, टिपेश्वर येेेेथील वनपरिक्षेत्र अधिकारी मगेश बाळापुरे यांनी सांगितले.
योगेश पडोळे
प्रतिनिधी पांढरकवडा