Published On : Thu, Jun 29th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात बकरीद ईद उत्साहात साजरी

नागपूर : राज्यात 29 जूनला बकरी ईद म्हणजेच ईद-उल-अजहा साजरी करण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर आज नागपुरातही मुस्लीम बांधवांनी एकत्रित येत मोमीनपुऱ्याच्या जामा मशिद आणि ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करुन ईद साजरी केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.

मुस्लिम बांधवांकडून वर्षभरातील दोन महत्त्वाचे सण साजरे केले जातात ज्यात रमजान ईद आणि बकरी ईदचा समावेश आहे.
रमजान ईद झाल्यावर सुमारे 70 दिवसांनी बकरी ईद साजरी केली जाते. मात्र बकरी ईद साजरी करण्याबाबत आणि कुर्बानी देण्याचा एक इतिहास आहे, ज्याचा कुराणमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव सौदी अरबच्या मक्कामध्ये एकत्र येऊन हज साजरा करतात. ज्यात जगभरातील मुस्लीम सहभागी असतात. याच सणाला ईद-उल-जुहा म्हणतात ज्याचा अर्थ त्यागाची ईद असा आहे.

Gold Rate
Saturday 25 Jan. 2025
Gold 24 KT 80,700/-
Gold 22 KT 75,100/-
Silver / Kg 92,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुस्लिम बांधवांमध्ये रमजान ईद प्रमाणेच ईद-उल-जुहाला विशेष महत्त्व समजले जाते. या दिवशी रमजान ईद प्रमाणे सर्व मुस्लीम बांधव एकत्र येऊन ईदची नमाज अदा करतात.

Advertisement