भोपाल : राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोरम या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरूच आहेत. तेलंगणामध्ये शेवटच्या टप्प्यात मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. मात्र निकालपूर्वीच मध्यप्रदेशमध्ये एका केंद्रावर मतपेट्या उघडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून यावर काँग्रेस पक्षाने संताप व्यक्त केला.
राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोरम या पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. मात्र तत्पूर्वी मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात ७ नोव्हेंबर रोजीच स्थानिक तहसील कार्यालयातील स्ट्राँग रुम उघडल्याचा प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेश काँग्रेसकडून या प्रकाराचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मध्यप्रदेश काँग्रेसने x वर एक व्हिडीओ पोस्ट करत लिहिले की, निवडणुकीला कलंकित करणारे बालाघाटचे जिल्हाधिकारी, मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. गिरीश मिश्रा यांनी आज 27 नोव्हेंबर रोजी उमेदवारांना न कळवता स्ट्राँग रूम उघडून पोस्टल मतपत्रिकांच्या पेट्या उघडल्या.
शेवटचे श्वास मोजत असलेले शिवराज सरकार आणि सरकारच्या आंधळ्या भक्तीत रमलेले जिल्हाधिकारी हे लोकशाहीला मोठा धोका आहे.
काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने सजग व सतर्क राहिले पाहिजे. भाजपच्या दारुण पराभवाने हताश झालेले हे चोरटे सरकार आणि काही सरकारी दलाल मतांची चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दात काँग्रेसने टीकेची झोड उठवली आहे.
निर्वाचन को कलंकित करते बालाघाट कलेक्टर
मध्यप्रदेश के बालाघाट जिले के कलेक्टर डॉ. गिरीश मिश्रा ने आज 27 नवंबर को ही स्ट्रांग रूम खुलवाकर बिना अभ्यर्थियों को सूचना दिए डाक मतपत्रों की पेटियां खोल दी है।
अंतिम साँसें गिनती शिवराज सरकार और सरकार की अंधभक्ति में लीन कलेक्टर… pic.twitter.com/I1UrKmHK5B
— MP Congress (@INCMP) November 27, 2023