Advertisement
नागपूर : शेती उत्पादनात शेतकऱ्यांपेक्षा ज्यांची महत्वाची भूमिका असते अशा या बैलांचा सण म्हणजेच बैलपोळा. वर्षभर शेतामध्ये राबणाऱ्या बैलांसाठी हा एकमेव सण आज सर्वत्र साजरा करण्यात येत आहे.
दुष्काळ असो किंवा अतिवृष्टी सर्व बाजूला सारुन शेतकरी हा पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात. तर दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा करण्यात येतो.
तान्हा पोळा तसेच मारबत महोत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या सुरक्षिततेसाठी नागपूर शहरात १५ सप्टेंबर रोजी मद्य विक्रीच्या सर्व अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिले आहेत.
इतकेच नाही तर ग्रामीण भागात बैलपोळा उत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र अवैध दारू विक्रीला चाप लावण्यासाठी पोलीस विभागाने कंबर कसली आहे.