नागपूर : बँक ऑफ इंडिया, मुंबईच्या रिकव्हरी हेड ऑफिसने मेसर्स अभिजीत MADC नागपूर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या दोन संचालकांना हेतुपुरस्सर डिफॉल्टर म्हणून घोषित केले आहे.
कर्जदार संस्थेने 91.74 कोटी रुपयांचे लोन 21 दिसंबर, 2009 रोजी तत्कालीन नागपूर मध्य कॉर्पोरेट शाखेकडून घेतला होता जी नागपुर (मुख्य) शाखेत समाविष्ट झाली आहे.
बँकेने आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संचालक, मनोज जयस्वाल अध्यक्ष (प्रवर्तक संचालक) आणि अभिषेक जैस्वाल (संचालक) क्रेडिट माहिती कंपन्यांसोबत शेअर केले आहेत. 8 मे 2023 पर्यंत कंत्राटी व्याजासह थकित कर्जाची रक्कम रु. 138.29 कोटी इतकी झाली आहे. बँकेने 01.07.2015 रोजी हेतुपुरस्सर डिफॉल्टर घोषणेवर आरबीआय मास्टर परिपत्रकानुसार कर्जदार संस्थेच्या संचालकांवर विलफुल डिफॉल्टची कृत्ये केल्याचा आरोप केला आहे.
मनोज जयस्वाल हा शिवलोक, 801, बी-विंग, जे.पी. हाईट, आरबीआय ऑफिसर्स कॉलनीजवळ, गोंडवाना चौक, बायरामजी टाऊन, नागपूर येथे राहणारा आहे, तर अभिषेक जयस्वाल हा 246, उषा सदन, पं. आरएसएस मार्ग , नागपूर याठिकाणी राहतो. बँक ऑफ बँक ऑफ इंडियाचे हे पाऊल हेतुपुरस्सर कर्जबुडव्यांना आळा घालण्यासाठी आहे. जे बँकिंग उद्योगासाठी चिंतेचे कारण बनले आहे. मेसर्स अभिजीत MADC नागपूर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांना हेतुपुरस्सर डिफॉल्टर म्हणून घोषित करण्याचा बँकेचा निर्णय भविष्यात अशा पद्धतींविरूद्ध मजबूत प्रतिबंधक म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे.