नागपूर :राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुती सरकाला मोठे यश मिळाले.यापार्श्वभूमीवर तात्काळ सरकार स्थापित होऊन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र निकालाच्या दहा दिवसानंतरही राज्याचे मुख्यमंत्रीपद कुणाला मिळेल याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने मुख्यमंत्रीपद त्यांच्याच नेत्यांना मिळणार अशी चर्चा आहे. यातच
नागपूरमध्ये जागोजागी लागलेले फलक लक्ष वेधून घेत आहे.
मुख्यमंत्री पदासाठी शहरात देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात येत आहे. शहरातील शंकरनगर चौकात लागलेल्या एका पोस्टरवर हिंदीमध्ये ‘वापस आना पडता है, फिर वापस आना पडता है’ अशाप्रकारचे हिंदीतील वाक्य लिहिले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या फलकावर कोणत्याही पक्षाचे, संस्थेचे किंवा व्यक्तीचे नाव नाही. केवळ देवेंद्र फडणवीस यांचाच फोटो आहे.
त्यातही ते जनतेला संबोधित करताना दाखविण्यात आले.य बॅनरवर ‘पत्थर की बंदिश से भी क्या नदिया रुकती है, हालातो की धमकी से क्या अपनी नजरे झुकती है, किस्मत से हर पन्ने पर किस्मत लिखवाना पडता है, जिसमे मशाल सा जज्बा हो, वो दीप जलाना पडता है, वापस आना पडता है, फिर से वापस आना पडता है…’ अशाप्रकारच्या ओळी लिहिण्यात आल्याआहे. मुख्यमंत्री पदाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हे बॅनर चर्चेचे विषय ठरत आहे.