नागपूर : 2 ऑक्टोबर 1869 रोजी जगातील सर्वात लोकप्रिय स्वातंत्र्यसैनिक म्हणजेच महात्मा गांधी यांचा जन्म झाला. यापार्श्वभूमीवर जागतिक अहिंसा दिवस आयोजन समितीतर्फे नागपुरातील व्हेरायटी चौकात ‘बापू तुम्हे प्रणाम’ या मथळ्याखाली 2 ऑक्टोंबरला भजन अन् आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8.30 वाजता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून करण्यात येईल.हा कार्यक्रम फेसबुक लाइवर पाहण्यासाठी नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अधिकृत फेसबूक पेज https://www.facebook.com/NagpurCongressOfficial यावर पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधींनी महत्त्वाचे योगदान दिले. यामुळेच त्यांना ‘राष्ट्रपिता’ म्हणूनही ओळखले जाते. दरवर्षी त्यांची जयंती भारतात मोठ्या थाटात साजरी केली जाते. भारताव्यतिरिक्त, हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणूनही साजरा केला जातो, कारण त्यांना अहिंसावादी स्वातंत्र्य सैनिक म्हणून ओळखले जाते.