Published On : Tue, Feb 1st, 2022
By Nagpur Today Nagpur News

बस्तरवारी जलकुंभ स्वच्छता फेब्रु. ३ ला

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपल्या स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या वचनबद्धता अनुसरत दरवर्षीप्रमाणे यंदाही जलकुंभ स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. मनपा-OCW दरवर्षीच नागपुरातील सर्व जलकुंभ वर्षातून एकदा स्वच्छता करीत असते. हि परंपरा मनपा-OCW ने २०१२ पासून नित्यनियमाने सुरु केलेली आहे. सतरंजीपूर झोन अंतर्गत बस्तरवारी १ आणि २ जलकुंभ फेब्रुवारी ३ (गुरुवारी) ला स्वच्छता करण्यात येणार आहे . या जलकुंभ स्वच्छतेमुळे तेथील भागात पाणीपुरवठा बाधित राहील. ह्या जलकुंभ स्वच्छता शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

सतरंजीपुरा झोन: पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग

Gold Rate
Monday 31March 2025
Gold 24 KT 90,500 /-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg 101,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बस्तरवाडी जलकुंभ : गुरुवार ०३ ०२.२०२२
दलालंपुरा चौक, तेलीपुरा पेवठा आंबेडकर पुतळा , बरैपुरा महारुद्र सभागृह , जसवंत चौक, कुंभारपूर, मातेपुर मांगपूर, दहिबाझार रोड, कौमीबाग, बस्तरवारी माता मंदिर, गोन्दपुरा, खैरीपुर, साहेबालवाडी, भारतीय वाडी, पंगेपुर, देवघरपुरा, झाडे चौक, प्रेम नगर, आणि नारायणपेठ.
लालगंज, खैरीपुपुरा , लालगंज पोलीस चोवंकी-नाईकवाडी, चाकण चौक, नाईक तलाव, बंगला देश, राऊत चौक, बरैपुरा, राम नगर, संभाजी कासार, धीवरपूर, बंगालीपंज, लेंडी तलाव, मुसलमान पुरा, लाल दरवाजा, टांडापेठ, उमटवाडी, मोचीपूर, आदर्श विणकर कॉलोनी, दारव्हेकर दंगल, लाडपुरा, स्वामी नगर, पाचपावली, शास्त्री नगर गार्डन , कुंभारपपुरा मोचीपुरा.

ह्या जलकुंभ स्वच्छता आणि शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे
अधिक माहिती करिता मनपा-OCW टोल फ्री नंबर १८००२६६९८९९ वर नागरिक केव्हाही संपर्क करू शकतात.

Advertisement
Advertisement