गोरखपूर / नागपूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदारसंघाची निवडणूक ३ मार्चला होत आहे.
या निवडणुकीची जबाबदारी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वात गोरखपूरचे ५ हजार युवा वॉरियर्स मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणार आहे.
आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुक्काम सध्या गोरखपूरमध्ये असून, येथील प्रचाराची सूत्र त्यांनी हाती घेतली आहेत. तब्बल १५० बैठकांचे नियोजन, १० हजार भाजपाच्या कार्यकर्त्यांच्य्या माध्यमातून ५ लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन आ. बावनकुळेंनी पूर्ण केले आहे.
महत्वाचे म्हणजे संपूर्ण देशाचे लक्ष या मतदार संघाकडे असल्याने ५ हजार सक्रिय तरुणांच्या माध्यमातून विजयाचे लक्ष पूर्ण करायचे असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
गोरखपूरच्या जबाबदारी विषयी काय म्हणाले आ. चंद्रशेखर बावनकुळे
प्रथमतः त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रसाद नड्डा यांचे आभार मानले. महाराष्ट्रातील माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला योगीजींच्या मतदार संघाची जबाबदारी मिळते ही भाग्याची गोष्ट आहे.
आज दिनांक २४-०२-२०२२ गोरखपुर शहर विधान सभा ३२२ मालवीय नगर मंडल सैनिक विहार में परम पूज्य योगी आदित्यनाथ महाराज जी के समर्थनार्थ महिला चौपाल करते हुए। कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में मेरा सहभाग रहा।
कार्यक्रम भाजपा महानगर महिला मोर्चा 1/2 #UPElections2022 pic.twitter.com/B1Tw9BUcqE
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) February 24, 2022
राष्ट्रीय नेतृत्वाने महाराष्ट्राच्या बाहेर आणि ते पण योगी आदित्यनाथ जी यांच्या मतदार संघासाठी प्रभारी म्हणून निवड केली. याचा आनंद असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.