Advertisement
नागपूर : राज्यभरासह नागपुरात गणरायाचे आगमन झाल्याने सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच सेलिब्रेटी आणि राजकीय नेत्यांच्या घरी लाडक्या बाप्पा विराजमान झाले आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानी गणरायाची स्थापना झाली.
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणेशोत्सवाची प्रत्येक जण आतुरतेने प्रतीक्षा करत असतो.
आज सर्वत्र भक्तीमय आणि उत्साही वातावरण आहे. सर्वसामान्य जनताच नाही तर राजकीय नेते मंडळी , सेलिब्रिटी देखील गणरायाच्या भक्तीत तल्लीन झालेले दिसत आहे.