Published On : Mon, Aug 19th, 2024
By Nagpur Today Nagpur News

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे लाडक्या बहिणीचा संसार सुखाचा झाला; महिलांकडून कौतुकाचा वर्षाव

Advertisement

ladli behan yojna nagpur

नागपूर:महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली आहे. त्या अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत.

लाडक्या बहिणींकडून देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक – या योजनेचा पहिला हफ्ता रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने महिलांच्या खात्यात जमा झाला. यानंतर महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लाभार्थी महिलांनी भाजपसह महायुती सरकारचे आभार मानत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. भाजपाकडून ठिकठिकाणी ‘लाडक्या बहिणीचा देवा भाऊ’ कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. महिलांना अधिकार मिळत असताना विरोधकांच्या पोटात दुखते.पुरुषांच्याही पोटात दुखतं कारण त्यांना वाटतं इतकी वर्षे आम्ही सत्ता गाजविली आता यांच्या हातात अधिकार येणार. परंतू आता महिला करतील, महिला ठरवितील तिच दिशा राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांना आरक्षण मिळवून दिल्याने राजकारणात आता महिलांचे राज्य येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी ही योजनेचा शुभारंभ करताना फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

Gold Rate
Monday 31March 2025
Gold 24 KT 90,500 /-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg 101,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महिलांना मागे ठेवून कोणताच देश प्रगत होत नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात महिला सक्षमीकरणाचे काम सुरू आहे. लाडकी बहीण योजनेवरुन कुणी काहीही म्हणाले तरी, महिला विकत घेता का? लाच देता का? नालायकांनो, तुम्हाला बहिणीचं प्रेम कळणार आहे की नाही, बहिणी जेव्हा प्रेम करतात तेव्हा भरभरून करतात. स्वत: उपाशी राहून भावाला पोटभर जेवायला घातलात. तुम्हाला संधी मिळाली तेव्हा तुम्ही का नाही दिले?,असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. तसेच महिलांना मागे ठेवून कोणताच देश प्रगत होत नाही,असेही फडणवीस म्हणाले.

 

Advertisement
Advertisement