नागपूर: महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली आहे. त्या अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा पहिला हफ्ता रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने महिलांच्या खात्यात जमा झाला. यानंतर महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
लाभार्थी महिलांनी भाजपसह महायुती सरकारने तोंडभरून कौतुकही केले. यातच भाजपने लाडकी बहीण योजनेवरील एक गीत लॉन्च केले आहे.
या गाण्याचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात असून सोशल मीडियावर गाण्याने धुमाकूळ घातला आहे.माझ्या भावाने निश्चय पक्का केलाय गं लाडक्या बहिणींचा संसार सुखाचा झालाय गं! अशा आशयाचे हे भन्नाट गाणे लाडक्या बहिणींच्या आनंदात भर घालत आहेत.अस्सल ग्रामीण ढंगाचे, बोलीभाषेतील हे लोकप्रिय लाडकी बहीण योजनेवरील गीत हे भाजपकडून झालेला नक्कीच स्तुत्य प्रयत्न आहे.