नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काहीच दिवस शिल्लक उरले आहे. त्याअनुषंगाने महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येत आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास काही योजना राबवल्या जाणार असल्याची माहिती जाहीरनाम्यातून देण्यात आली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना महिन्याला १५०० वरून २१०० रुपये देण्याचे आश्वासन जाहीरनाम्याच्या माध्यमातून देण्यात आले.
जाहीरनाम्यात देण्यात आलेले आश्वासन-
– लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना २१०० रुपये देण्यात येणार
– महिला सुरक्षेसाठी २५ हजार महिलांना पोलिस दलात समावेश करण्यात येणार
– धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजर रुपये देण्यात येणार
– ग्रामीण भागात ४५००० पाणंद रस्त्यांच्या निर्मिती करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा आणि शेती पिकांच्या किमान आधारभूत किंमतीवर २० टक्के अनुदान देणार
– वीज बिलात ३० टक्के कपात करून सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देणार
– वृद्ध पेन्शन धारकांना आता १५०० ऐवजी महिन्याला २१०० रुपये देण्याचा निर्णय घेणार
– दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतन देणार
– २५ लाख रोजगार निर्मितीचे आश्वासन