नागपूर: बेलतरोडी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे. संतोष सुरेश राजपूत (वय 45, रा. रामटेके नगर, अजनी, नागपूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीकडून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती:आरोपीविरुद्ध नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.पोलिसांनी त्याचा क्राइम चार्ट तयार केला आहे.विविध पोलीस ठाण्यांना आरोपीविषयी बीसी मेसेज पाठवण्यात आला आहे.घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.आरोपी दोन महिन्यांपूर्वी चंद्रपूर कारागृहातून दोन वर्षांची शिक्षा पूर्ण करून सुटला होता, मात्र त्यानंतरही त्याने पुन्हा गुन्हेगारी सुरूच ठेवली.
दरम्यान ही कारवाई मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ क्र. 04 आणि सहाय्यक पोलीस आयुक्त, अजनी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासासाठी पो.नि. मुकुंद कवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कांडुरे, तसेच पोलीस हवालदार सुहास शिंगणे, सुरेंद्र बोपचे, विवेक श्रीपाद, प्रमोद दिवगडे, मंगेश आणि DB पथक टीम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बेलतरोडी पोलिसांनी तातडीने गुन्हा उघडकीस आणत आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.