कामठी :-कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी तसेच आगामी तिसऱ्या लाटेचा प्रदूर्भाव रोखण्यासाठी प्रशासन तारेवरची कसरत करीत आहे.तसेच शासनाने आदेशीत केलेल्या लॉकडॉउन नुसार लागू असलेले कडक निर्बंधानुसार सकाळी 7 ते 11 पर्यंत जीवणावश्यक वस्तूंची दुकांने सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे मात्र या वेळेत काही दुकांदारवर्ग लागू असलेल्या नियमांचे उल्लंघन करीत सकाळी 11 नंतर ही दुकाने सुरू ठेवून सोशल डीस्टांनशिंग चा फज्जा उडवित आहेत ज्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस आहे तेव्हा नागरिकांनी कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाने मार्गदर्शीत केलेल्या सूचनांचे पालन करावे असे आव्हान करीत असले तरी प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवीत काही नागरिक बेभान वागून कोरोना चा पसराव करण्यास कारणीभूत ठरत आहेत
त्यासाठी आज जुनी कामठी पोलीस स्टेशन व नगर परिषद कामठी यांच्या संयुक्त पथकाने आज शुक्रवारी आठवडी बाजाराच्या दिवशी सकाळी 11 नंतर सुरू असणाऱ्या दुकांदारावर कारवाही करीत 16 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच येत्या दोन दिवसात बाजारपेठेतील सर्व दुकानदारांची कोरोनाची अँटीजन टेस्ट करण्यात येणार असल्याचे आव्हान वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांनी केले.याप्रसंगी मुख्याधिकारी संदीप बोरकर यासह नगर परिषद अधिकारी कर्मचारी पथकासह, पोलीस पथकाचा समावेश होता
संदीप कांबळे कामठी