भंडारा: भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार हेमंत पटले यांनी आपले उमेदवारी अर्ज आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांना सादर केला.
याप्रसंगी भंडारा जिल्हा पालकमंत्री व निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, गोंदिया जिल्हा पालकमंत्री राजकुमार बडोले, भाजपाचे प्रदेश संघटन सचिव डॉ. उपेंद्र कोठेकर, आ. अनिल सोले, आ. चरण वाघमारे, आ. बाळा काशीवार, आ. विजय रहांगडाले, आ. रामचंद्र अवसरे, आ. संजय पुराम, माजी खा. शिशुपाल पटले, खुशाल बोपचे, बाळ अंजनकर, माजी आ. केशवराव मानकर, भंडारा जिल्हा भाजपाध्यक्ष तारीक कुरेशी प्रामुख्याने उपस्थित होते.
शहरातील जलाराम मंगल कार्यालय येथून प्रचंड मोठ्या रॅलीने हेमंत पटले निवडणूक अर्ज सादर करण्यास गेले. शहरातील प्रमुख मार्गाने ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर आली. या दरम्यान शहरातील संपूर्ण वातावरण भाजपमय झाले होते. सुमारे 15 ते 20 हजार कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. हेमंत पटले यांनी 3 उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्यांना सादर केले. यानंतर भाजपा कार्यकर्त्यांच्या रॅलीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी संबोधित केले.
या रॅलीत भाजपा कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यात नगराध्यक्ष सुनील मेंढे, प्रदीप पडोळे, धनवंता राऊत, अशोक इंगळे, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, सौ. नीलिमा हुमणे, नगराध्यक्ष अशोक रहांगडाले, डॉ. खुशाल बोपचे, डॉ. प्रकाश मालगावे, दादा टिचकुले, माजी आ. होमेश रहांगडाले, सौ. रेखा भाजपाले, रचना गहाणे, माजी आ. भजनदास वैद्य, हरीश मोरे, भेडसिंग नागपुरे, अल्ताफ हमीद, विनोद अग्रवाल, धनंजय मोहरकर, डॉ. युवराज जमईवार, जयंत शुक्ला, मुकेश थानथराटे, राजकुमार गजभिये, माजी आ. हेमकृष्ण कापगते, शिवराज गिर्हेपुंजे, कासीम जमाा कुरेशी, भाऊराव तुमसरे, अरविंद भालाधरे, प्रशांत खोब्रागडे, नरेश खरकाटे, रवी बोपचे, संतोष चव्हाण, भाऊराव उके, माजी जि.प.अध्यक्ष नेत्रामभाऊ कटरे, भाजपा शहर अध्यक्ष सुनील केलंका, भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष किशोर थलानी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रचना गव्हाणे, प्रदेश महिला मोर्चा सचिव सीता रहांगडाले, जि.प. सभापती शैलजा सोनवणे, माजी जि.प. सभापती छाया डफरे, नगरसेविका हेमलता फतेह, माजी सभापती कविता रंगारी, भाजपा जिल्हा सचिव आकाश खंडेलवाल, गोंदिया भाजयुमो उपाध्यक्ष रोहित अग्रवाल, रेखलालजी टेमरे, गोंदिया दामिनी संघटनेचे राम पुरोहित, नामदेव बारापाात्रे, नायकराम भेंडारकर, सदानंद निमकर, टेकचंद सावरकर व भाजपाचे विविध आघाड्यांचे अध्यक्ष व महामंत्री, भंडारा गोंदिया जिल्ह्यातील बुथप्रमुख, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते.