नागपूर -भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिने अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर परतल्या आहेत.19 मार्चला पहाटे त्यांचे त्या पृथ्वीवर परतल्या. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी 5 जून 2024 रोजी बोईंगच्या स्टारलायनर अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे गेले होते. मात्र प्रक्षेपणानंतर अंतराळयानाच्या सर्व्हिस मॉड्यूलच्या थ्रस्टरमध्ये हीलियम गळती आणि इतर तांत्रिक अडचणी आल्या ज्यामुळे त्यांचे परतीचे वेळापत्रक लांबले.
हा प्रवास 8 दिवसापासून 9 महिन्यापर्यंत पोहोचला. या दरम्यान त्यांनी अवकाशात अनेक संशोधन, प्रयोग केल्याची माहिती आहे. या अडचणींमुळे नासाने स्पेसएक्सच्या ड्रॅगन अंतराळयानाद्वारे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्याचा निर्णय घेतला.
स्पेसएक्सच्या क्रू-9 मोहिमेतील ड्रॅगन अंतराळयानाने 9 ऑगस्ट 2024 रोजी ISS वर यशस्वीपणे डॉक केले ज्याद्वारे त्यांच्या परतीची योजना निश्चित करण्यात आली. सुनीता विल्यम्स यांच्या सुरक्षित परतीसाठी त्यांच्या मूळ गाव गुजरातमधील झुलासन येथे ग्रामस्थ आणि नातेवाईक प्रार्थना करत होते. त्यांच्या परतीची बातमी ऐकून गावासह संपूर्ण भारतामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सुनीता आणि विल्मोर यांनी जून २०२४ मध्ये पृथ्वी सोडली. सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांनी ५ जून २०२४ रोजी पृथ्वी सोडली आणि त्यांचा आयएसएसवरील मुक्काम थोड्या काळासाठी नियोजित होता. तथापि, काही वेळातच, अभियंत्यांना स्टारलाइनरमध्ये हेलियम गळती आणि प्रणोदन प्रणालीमध्ये बिघाड आढळला, ज्यामुळे अंतराळयान परतण्यासाठी असुरक्षित झाले. ऑगस्ट २०२४ मध्ये, नासाने विलंब मान्य केला आणि २०२५ च्या सुरुवातीला स्पेसएक्स मोहिमेद्वारे त्यांच्या परतीची योजना सुरू केली असे सांगितले.