भारतीय घटनेचे शिल्पकार “भारत रत्न” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे, मा.आमदार कृष्णा खोपडे व सभापती विधी समिती श्री.धर्मपाल मेश्राम यांनी सकाळी सेंट्रल ऐव्हन्यू रोड स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन नगरीतर्फे विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी सतरंजीपूरा झोन सभापती अभिरुची राजगिरे, लकडगंज झोन सभापती राजकुमार साहु, नेहरुनगर झोन सभापती समिता चकोले, नगरसेविका भूरे, कांताताई रारोकर, मनीषा धाबडे, आशीष मेरखेंडे, राहूल मेंढे, इंद्रजीत वासनीक, प्रभाकर मेश्राम, कूंदन नितनवरे, कुंदन रामटेके, अजय बागडे, सौरभ बूरेवार, गौतम नंदेश्वर, मुन्ना पाटील, अनिकेत शेन्डे, निरंजन दहिवले, मोनू सातपूते, भूपेश चेलानी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.