Advertisement
सामाजिक कार्यासोबतच क्रीडा क्षेत्रातील अग्रणी व्यक्तीमत्व असलेले नागपूरचे माजी महापौर व महाराष्ट्राचे माजी मंत्री स्व.भाऊसाहेब सुर्वे यांच्या ३० व्या पुण्यतिथी निमित्त महाल टाऊन हॉल जवळील स्व.भाऊसाहेबांच्या पुतळयाला गांधीबाग झोन सभापती सुश्री वंदना यंगटवार
यांनी नगरीच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
यावेळी मराठा लॉर्न्स्सचे शिवाजीराव मोहिते, क्रष्णराव शिर्के, प्रकाश कुवीटकर, श्रीमती चाँदवी, सहा.जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, विकास अपराजित व जमीलभाई आदी उपस्थित होते.