Published On : Sun, Mar 25th, 2018

जॉगींग, वाकिंग, सायकल ट्रॅकचे कस्तुरचंद पार्कवर भूमिपूजन

Advertisement

नागपूर: राज्य शासनाच्या निधीअंतर्गत महानगरपालिकेद्वारे शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कस्तुरचंद पार्कवर साकारण्यात येणाऱ्या जॉगींग, वॉकिंग आणि सायकल ट्रॅकचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि ऊर्जामंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, मनपा स्थायी समितीचे सभापती विरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्ष डॉ. दीपक म्हैसेकर, मंगळवारी झोन सभापती सुषमा चौधरी, धरमपेठ झोन सभापती रूपा राय, स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, विधी समितीचे सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम, कर आकारणी समितीचे सभापती संदीप जाधव, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक सुनील हिरणवार, किशोर जिचकार, नगरसेविका स्नेहा निकोसे, ममता सहारे, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, शहर अभियंता मनोज तालेवार, सोलर इंडस्ट्रीज इंडिया लि.चे व्यवस्थापकीय संचालक मनीष नुवाल, उपाध्यक्ष जे. एफ. सालवे उपस्थित होते.

Gold Rate
16April 2025
Gold 24 KT 95,000/-
Gold 22 KT 88,400/-
Silver / Kg - 96,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कस्तुरचंद पार्कच्या सौंदर्यीकरणा अंतर्गत तेथे नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक, जॉगींग ट्रॅक, सायकल ट्रॅक साकारण्यात येत आहे. सभोवताल वृक्षलागवड करण्यात येणार आहे. तर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनेल, असा सेल्फी प्वॉईंट तयार करण्यात येत आहे. सेल्फी प्वॉईंट पूर्णत: सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनी साकारणार असून अन्य सौंदर्यीकरणाचा प्रकल्प ११ कोटींचा आहे. राज्य शासनाने पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे. या सौंदर्यीकरणासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विविध आर्किटेक्ट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या संकल्पना सादर केल्या होत्या. त्यात ‘आयडियाज’ आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली संकल्पना निवडण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य अभय पुरोहित आणि प्रा. केतन किंमतकर यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यानी डिझाईन सादर केले होते.

या संपूर्ण कार्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यानंतर वास्तु विशारद अशोक मोखा यांनी कस्तुरचंद पार्कचा चेहरामोहरा बदलणाऱ्या प्रकल्पाचे सादरीकरण केले. यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सोलर इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक मनीष नुवाल यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन मनपाचे जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.

असे राहील सौंदर्यीकरण

कस्तुरचंद पार्कच्या सौंदर्यीकरणामध्ये जॉगींग, वॉकिंग, सायकल ट्रॅकसह संपूर्ण हेरिटेज स्ट्रक्चरला स्टील रेलिंगचे कम्पाऊंड, सर्वात उंच ध्वज, नवीन प्रवेशद्वार, ट्रॅकच्या दोन्ही बाजूंनी वृक्ष, संपूर्ण ट्रॅकवर लाईटस्‌, हेरिटेज स्ट्रक्चरवर रोषणाई, उत्तर आणि दक्षिण बाजूंनी प्रसाधनगृह, रेनवॉटर हार्वेस्टिंग, मेट्रोच्या भिंतीवर एलईडी स्क्रीन, कारंजे, वाहनतळ, बसण्यासाठी बेंचेस, लहान मुलांसाठी खेळण्याचा एरिया, अशोक स्तंभ, ‘आय लव नागपूर’ असे लिहिलेला सेल्फी प्वॉईंट, उत्तर आणि दक्षिण दिशेला सुरक्षा रक्षक खोली आदींचा समावेश राहील.

Advertisement
Advertisement