खापरी पुनर्वसन टप्पा १ मध्ये ३३ कोटींच्या विकासकामाचे भूमिपूजन भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार मा. चंद्रशेखर बावनकुळे, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, कामठीचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दि. २८ मार्च रोजी सायंकाळी ५ वा. करण्यात येणार आहे.
खापरी पुनर्वसन क्षेत्रातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी श्री बावनकुळे यांनी पुढाकार घेत बैठक घेतली होती, त्यानंतर येथील विकासकामांच्या निविदा काढण्यात आल्यावर आता विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येत आहे.
खापरी पुनर्वसन येथे ३२ कोटीच्या निधीतून रस्ता, इलेक्ट्रिक पोल, पाणी पुरवठा योजना, गडर लाईन, नाली बांधकामाचा समावेश आहे तर पुनर्वसन क्षेत्रात ९८ लाख रुपयांच्या निधीतून रस्ता डांबरीकरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य मेघा मानकर, पंचायत समिती सदस्य सुनीता बुचडे, खापरी रेल्वे-कलकुहीच्या सरपंच रेखा सोनटक्के, माजी जि.प. सदस्य रुपराव शिंगणे, सामाजिक कार्यकर्ते केशवराव सोनटक्के यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व प्रशासनातील अधिकारी उपस्थित राहतील.