नागपूर : प्रभाग क्र.२७ ‘अ’ व नविन प्रभाग क्र. ३० अंतर्गत येणा-या हसनबाग ते स्वातंत्रनगर पर्यंतच्या परिसरात मलवाहिनी टाकण्याच्या कामाकरीता रु. २.५० कोटी मंजूर करण्यात आले. या कामाचे भुमिपूजन मा.श्री. अभिजीत वंजारी, आमदार विधान परिषद यांच्या शुभहस्ते, मा.श्री.तानाजी वनवे, विरोधी पक्षनेता, मनपा, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख अतिथी श्री. कमलाकर घाटोळे, प्रदेश महामंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या उपस्थितीत दिनांक ११ फेब्रुवारी, २०२२ रोजी संपन्न झाले.
या मलवाहिनीमुळे हसनबाग ते स्वातंत्रनगर, नंदनवन कॉलनी, एमआयजी कॉलनी, एचआयजी, सदभावनानगर, कवेलु गाळे, दर्शन कॉलनी, व्यंकटेशनगर, वृंदावननगर इत्यादी वसाहतींना याचा लाभ मिळेल. या कामाकरीता मा.ना.डॉ. नितीन राऊत साहेब पालकमंत्री नागपूर जिल्हा तसेच मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांचे आभार मानले.
या भुमीपूजन कार्यक्रम प्रसंगी प्रभागातील विजय वनवे, अभिषेक गायधने, डॉ.उमाजी कोहळे, अनवर चाचा, संजय नगरारे, राजेंद्र काळमोघ, नाना जांभूळकर, मिलींद गाडगे, प्रशांत पाटील, मधुकर पेठे, प्रभु वंजारी, पोवळे काका, पदमाकर कडू, राजू भंडारी, भांगे ठेकेदार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.